पालकांना विंनती की शाळेच्या शिस्तीसाठी व नियमीततेसाठी सहकार्य करावे.
शाळेत प्रत्येक दिवसाच्या नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण झालेल्या पाठावार होमवर्क दिला जातो.पालकांनी आपला पाल्य होमवर्क करत आहे किंवा नाही याकडे लक्ष द्यावे.
पालकांनी दररोज स्कूलडायरी मधील सूचना वाचून स्वाक्षरी करावी. काही तक्रार असल्यास स्कूलडायरी मध्ये नोंद करावी.
आपला पाल्य अभ्यासामध्ये कमी पडत असल्यास शाळेत येऊन प्राचार्यशी संपर्क साधावा.परस्पर शिक्षकांना भेटणे टाळावे.
प्रत्येक महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात टेस्ट घेतली जाते व प्रोग्रेस रिपोर्ट पाहून स्वाक्षरी करणे आनिवार्य आहे.
LKG आणी UKG मधील विध्यार्थ्याचे पालक प्रत्येक महीन्याच्या ५-१० तारीखेच्या दरम्यान शाळेत येऊन प्रोग्रेस रिपोर्ट पाहून स्वाक्षरी करणे आनिवार्य आहे. काही सूचना असल्यास पालकांना कळविले जाईल.
प्रत्येक महिन्यात ४ थी ते ९ वी च्या विध्यार्थ्यासाठी वादविवाद स्पर्धा,निबंध स्पर्धा,शूध्दलेखन स्पर्धेचे आयोजन केले जाते.त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला प्रोत्साहन देऊन सहकार्य करावे.
आभ्यासाबद्दल काही तक्रार असल्यास खालील फोन नंबरवर संपर्क साधावा ७७३८१४२०७६ ७७३८७०२०७६,२४५६००. पाल्यांच्या शैक्षणिक प्रगती करीता महीन्यातून किमान एकदा शाळेत येऊन संबंधिताना भेटावे.
दररोज स्वच्छ व इस्त्री केलेले युनिफॉर्म मध्ये पाठवावे(अस्वच्छता पाल्यांच्या शिक्षेस कारणीभूत ठरेल.)
पालकांनी शाळेत येऊन परस्पर आपल्या पाल्यांला भेटणे किवां घेउन जाणे टाळावे.संबंधीत शाळेच्या व्यक्तीना भेटूनच पाल्यांना भेटावे.
प्रत्येक महिन्यात दूसऱ्या शनिवारी सूट्टी राहील व अन्य शनिवारी पूर्ण शाळा राहील.
ठरलेल्या वेळेत आपल्या पाल्यांला ठराविक स्टापवर स्कूलबससाठी हजर ठेवावे.
कोणत्याही कारणाने शाळेच्या वाहनातल्या कर्मचार्यांशी वाद घालून,शाळेने ठरवून दिलेल्या वेळेत वाहनास येण्यास विलंब करू नये.
शाळेचे वाहन आणणे व नेण्यासाठी केलेली सूविधा आहे,वाहनामध्ये येणाऱ्या औराद शहा.च्या विध्यार्थ्यांसाठी वाहनाचे अतिरिक्त शूल्क आकारलेले नाही,याची पालकांनी नोंद घ्यावी.
कोणत्याही कारणास्तव वाहन येण्यास किंवा पाल्यांस तयार होण्यास विलंब झाल्यास पालकांनी आपल्या पाल्याला शाळेत आणून सोडावे.
स्कूलबसच्या ड्रायव्हरचा व साहाय्यकचा मो.नं.
शाळेने ठरवून दिलेल्या कालावधीत पालकांनी शाळेची फिस भरणे अनिवार्य आहे.अन्यथा योग्य ती कार्यवाही केले जाईल.
शाळेने वेळोवेळी दिलेल्या सूचनेकडे लक्ष देऊन सहकार्य करावे.